भोकर तालुक्यातील ४१ गावाचे अतिवृष्टी अनुदान शेतकर्याच्या खात्यावर थेट जमासाठी शासनाकडे अपलोड


भोकर - जुन- जुलै मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत मिळावी म्हणुन महसुल प्रशासन तालुक्यातील ४१ गावांची यादी शासनाकडे अपलोड केली असुन आता थेट खात्यात पैसे जमा होणार असल्याचे महसुल विभागाकडून सांगण्यात आले.

    शेतकर्याच्यां खात्यात थेट पैसे टाकण्यासाठी शासनाने निकष आखले असुन आता यात महसुल विभागाकडून ज्या गावच्या तलाठी कडुन याद्या प्राप्त झाल्या त्या याद्या शासनाच्या संकेत स्थळावर अपलोड करण्यात येत असुन अपलोड झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून थेट अनुदान रक्कम टाकण्या त येऊन चार अंकी कोड येते ते कोड घेऊन शेतकऱ्यांनी अधारचा अंगठा सुविधा केंद्रात लावल्या नंतर पैसे उचलता येतात असे सांगण्यात आले.सध्या भोकर तालुक्यातील ४१ गावांची यादी शासनाकडे अपलोड करण्यात आली आहे.यात गारगोटवाडी, पांडुर्णा,डोरली,समंदरवाडी,बोरवाडी,जाकापुर,  आमठाणा,मोखंडी,नसलापुर,नेकली,मसलगा,मालदरी,थेरबन,जांभळी,कामनगाव,मोघाळी,ईळेगाव,पाळज,माळसापुर,राळज,रावनगाव,लगळुद,भुरभुशी,जामदारी,जामदरीतांडा,धावरीबु.,धावरीखु,पाकी,देवठाणा सोनारी, सावरगाव मेट,कांडली,पोमनाळा,चिंचाळा प. भो., महागाव,दिवशी बु.,दिवशी खु,, नागापूर,मातुळ, कोंडदेव नगर,पिंपळढव आदी गावे अपलोड करण्यात आली आहे.

निकषात बदल- पुर्वी शासन असे पैसे जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करत मग जिल्हाधिकारी कार्यालय तहसिलकडे वर्ग करत असत अन तहसिल ते पैसे बँकेत जमा करत असत पण आता थेट पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याने यात महसूल विभागाने नुकसान ग्रस्त गावच्या याद्या थेट मंत्रालय स्तरावर पाठवून मग शासन थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार असा निकष आहे.

Post a Comment

Previous Post Next Post