प्रतिनिधी / माली पाटील
∆ भारतीय शेतकऱ्यांचे अंगीकृत संघटन असलेल्या किसान एकता संघ मराठवाडा विभागाच्या अध्यक्षपदी भोसी येथील शेतकरी प्रतापराव जगदेवराव कल्याणकर देशमुख भोसीकर यांची मराठवाड्याच्या विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यांच्या या नियुक्तीमुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या हितासाठी लढणारी भारत के किसानो का संघटन म्हणून कार्य करणारी किसान एकता संघ आहे.या संघाचे महाराष्ट्र भर शेतकरी हिताचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाते.याच संघटनेचे धडाडीचे नेते श्री प्रतापराव देशमुख भोसीकर यांचे शेतकऱ्यां विषयी असलेले कार्य पाहुन त्यांना किसान एकता मराठवाडा अध्यक्ष पदी निवड केली आहे.त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.