प्रतिनिधी/ माली पाटील
_____________________________________________
भोकर तालुक्यातील लामकानी येथील सर्पदंशाने बैल मयत झालेल्या शेतकऱ्यांना कु.दामीणी पा.ढगे यांच्या कडुन २१००० /- रुपयांची आर्थिक मदत. _________________________________________
भोकर- आगामी होत असलेल्या विधानसभेसाठी भोकर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उच्यशिक्षित इंजि. कु. दामिनी दादाराव ढगे पाटील यांच्या वतिने दि. २३ जुलै मंगळवार रोजी तालुक्यातील अनेक गावातील जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन व शालेय शाहित्य वाटप करण्यात आले. यावेळी साहित्य वाटपा सोबत अनेक ग्रामस्थाशी संवाद साधला असता यावेळी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भोकर विधानसभा मतदार संघातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे हे आपल्या मतदार संघात सामाजिक कार्यात नेहमीच हिरहिरीने सहभाग घेत असतात. गोरगरीब महिला ही आपली माता भगिनी समजून त्यांची सेवा करणे त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे त्यांचा सन्मान म्हणजे आपला सन्मान हा उदात हेतू मनात बाळगून त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी पसारातील गोरगरीब महिलांना आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये रोख रक्कम व साडी चोळी करून त्यांचा आदर सत्कार केला. यांच्या कार्याची पावती म्हणून की काय यांना भोकर विधानसभा मतदार संघात जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनतेच्या या प्रतिसादामुळे सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांनी नेहमीच काँग्रेस पक्षामध्ये सहक्रिय असणारी उच्य शिक्षित कन्या इंजि. दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांना आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. याच अनुषंगाने दादाराव पाटील ढगे हे नुकतेच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, आमदार अमित देशमुख यांची मुंबई येथे भेट घेऊन यांच्या हस्ते भोकर विधानसभेच्या इच्छुक उमेदवार इंजि. दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे छायाचित्र असलेल्या शालेय साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.याचाच भाग म्हणून नुकतेच जिल्ह्याचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भोकर विधानसभेतील मुदखेड येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे उदघाटनही करण्यात आले. यांच अनुषंगाने भोकर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे भावी व इच्छुक उमेदवार इंजि. दामिनीताई दादाराव ढगे पाटील यांच्या वतिने अर्धापूर, मुदखेडसह दि. २३ रोजी भोकर तालुक्यातील हळदा, लामकानी,हाडोळी, कामनगावं,मोघाळी, इळेगाव,धारजनी, धारजणी तांडा सोसायटी तांडा,नांदा, नांदा तांडा,बेंद्री तांडा,शिवनगर तांडा, बल्लाळ,बल्लाळ तांडा, कुदळा तांडा आदी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या पेन व शालेय शाहित्य वाटप करण्यात आले आहे.
यावेळी भुजंगराव शाहुजी ढगे, जीवन नाईक चिदगिरीकर,संजय मेंदेवाड, गोपीराज पवार, आनंद मगरे, बालाजीराव नागेलिकर, ओंकार ढगे, मोहनराव, हणमंत राव तोटेवाड आदी कार्यकर्त्यांसह, गावातील सरपंच, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.यावेळी इंजि.कु. दामिनीताई ढगे पाटील यांना ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
लामकानी येथील शेतकऱ्यास २१ हजार रुपयांची आर्थिक मदत
-------------------------------
तालुक्यातील लामकानी येथील शेतकरी मनिका लक्ष्मण चिकलपल्ले यांच्या एका बैलाला ऐन पेरणीच्या काळात दोन दिवसापूर्वी सर्पाने दंश केला असल्याने बैल दगावला.याची माहिती मिळताच या हतबल झालेल्या शेतातकऱ्यांना धीर देण्यासाठी इंजि. दामिनीताई ढगे पाटील यांचा वतीने २१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली.