प्रतिनिधी/ माली पाटील
भोकर तालुक्यातील पिंपळढव शिवाराजवळील वळणावरील रस्त्यावर दोन दुचाकीची समोरासमोर जोराची धडक होऊन झालेल्या या अपघातात चार जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वा १५ मि. सुमारास घडली आहे.
भोकर ते म्हैसा या राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळढव शिवारातील वळणावर दि.२३ जुलै रोजी सांयकाळच्या दरम्यान स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम एच २६ सीके ६६५९ व बुलेट गाडी क्र. एम एच 26 सीएफ ९६१८ या दोन्ही दुचाकीची समोरासमोर इतकी मोठी धडक झाली की, जाग्यावरच दोन गतप्राण झाले.आणी एक जण दवाखान्यात नेत असताना मृत्यू पावला. बुलेट गाडी ही नांदा म्है.प.येथील होती.या बुलेट वर तिघेजण भोकरहुन गावाकडे येत होते.तर दोन कर्मचारी व्यंकटराव देशमुख आश्रमशाळा मातुळ हे आपले काम आटपून भोकरकडे निघाले होते. तांडा व पिंपळढव दरम्यान शिवारातील वळणावर येताच या दोन्ही दुचाकी समोरासमोर धडकल्या ही इतकी जोर्यात होती की,पाच पैकी चौघांना जीव गमाव लागला.

या धडकेत मातुळ येथील आश्रमशाळेचे कर्मचारी गंगाधर विश्वनाथ मैसुरे वय ५५ वर्षे रा. शिळवणी ता. देगलूर ह. मु. भोकर तर मदतनीस पदावरील परसराम किसन डाखोरे वय ५० वर्षे रा. पांडुरणा ता.भोकर हे दोघे काय व्यंकटराव देशमुख निवासी आश्रम शाळा मातोड येथे मदतनीस व कामाठी पदावर कार्यरत होते. हे दोघे जाग्यावरच ठार झाले. तर ज्ञानेश्वर गणेश मानेबोईनवाड वय २५ रा. नांदा म्है.प, विनायक पोशट्टी बोरवाड वय २३ रा. नांदा म्है.प. हे बुलटस्वार ही ठार झाले.अशा या चौघाचा मृत्यू झाला असून श्रावण हनुमंत पेडेमोड वय २३ रा.कुंभारगाव ता. बिलोली हा गंभीर जख्मी झाल्याने त्याच्यावर भोकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी नांदेडला पाठविण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती कळताच पिंपळढव येथील नागरिक व तरुण धावुन आले व मदतीचा हातभार लावला. या भयावह अपघाताची माहिती कळताच ग्रामीण रुग्णालय भोकर सगेसोयरे व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. गुळगुळीत रस्ते झाल्याने वाहनधारकांची स्पीड व मद्य प्राशन करून गाड्या चालविणे अशा अनेक कारणांमुळे अपघात होऊन विनाकारण आपला जीव गमवायचा व दुसऱ्याचा ही जीव घ्यायचा आणि कुटुंब उघडे पाडायचे यांचा तरुणाईने विचार करावा.व नशेच्या तालात गाड्या चालवु नये एवढी जरी काळजी घेतली तरी अपघाताचे प्रमाण कमी होईल.