तेलंगणातील काँग्रेसचे नेते व आमदार-खासदार भोकरच्या विधानसभा रणांगणात

 

                     प्रतिनिधी / माली पाटील 

∆ भोकर विधानसभा निवडणुक रंगतदार होणार असुन प्रचाराचा धुरळा उडविण्यासाठी व भाजपला पराभूत करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेंवतरेड्डी यांच्या आदेशा नुसार काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी सुरू असून तेलंगणातील नेते, आमदार, खासदार व मंत्र्यांचे सचिव आदी मंडळी भोकर येथे रणनिती ठरविण्यासाठी ठिय्या मांडणार आहेत.त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे.

     भोकर विधानसभा मतदारसंघ -८५ या मतदारसंघात लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुक प्रचार रणधुमाळी सुरू झाली आहे.यात महाविकास आघाडी, महायुती, वंचित बहुजन आघाडी,लोकहित जनशक्ती पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष,मनसे, बहुजन समाज पार्टी सहित २१ उमेदवार रिंगणात आहेत.परंतु खरी लढत भाजप- काँग्रेस व नागनाथ घिसेवाड यांच्यातच मुख्य लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.निवडणुकीचा अनुभव असलेले बहुजन नेते नागनाथ घिसेवाड या विधानसभेत स्लो पाईजनचा खेळ सुरू केला असुन तिन्ही तालुक्यात ओबीसी, बहुजन, आदिवासी व इतर सर्व सामान्य मतदार त्यांच्या सोबत सध्या तरी दिसत आहे.भोकर तालुक्यात अनेक गावांत नागनाथ घिसेवाड यांना एकदाच मतदान करून विधानसभेत पाढवु असा निर्धार व्यक्त करत आहेत. जरांगे फॅक्टर मुळे ओबीसी व मागासवर्गीय आणि ओबीसी म्होरक्या लक्ष्मण हाके यांच्या वरील हल्ला यामुळे ओबीसी एकवटला आहे.याचा फटका दोन्ही पक्षांना बसणार आहे. हे मात्र नक्की. तसेच माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे काँग्रेस सोडून भाजपात गेले.त्यामुळे जनतेत तीव्र नाराजी झाली.अन मागील लोकसभा पोटनिवडणुकीत लोक भाजपला पराभुत केले.त्यामुळे आता काँग्रेस पक्ष पेटुन उठला आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पप्पू पाटील कोंढेकर यांना उमेदवारी दिली.तर भाजपाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.या निवडणुकी कडे राहुल गांधी लक्ष ठेवून आहेत.तर तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेंवतरेड्डी यांच्यावर वर ही पक्षाने जवाबदारी दिली असल्याने तेलंगणातील काँग्रेसचे नेते खासदार- आमदार व मंत्र्यांचे सचिव आदी मंडळी भोकर प्रचार दौर्या वर आले आहेत.दि.१० नोव्हेंबर रोजी तलाव रिसोड या हाॅटेलवर बैठक झाली.यावेळी आ.सोमेश्वररेड्डी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.खानापुर आ.रेखा नाईक, व्यंकट स्वामी पिसीसी नेते, उद्योगपती के. श्यामरेड्डी आणि आमदार व राजकीय विश्लेषक तिरमार मल्लन्ना सह असंख्य काँग्रेस नेते मुक्काम ठोकला आहे.लवकरच मुख्यमंत्री रेंवतरेड्डी यांची जाहीर सभा भोकर येथे होणार असल्याचे आ.सोमेश्वररेड्डी यांनी सांगितले.यामुळे भोकर विधानसभा मतदारसंघात रंगत वाढत असुन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना घेरले जात आहे.बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांची गाडी सुसाट वेगाने निघत आहे याचा फटका श्रीजया चव्हाण यांना बसणार यवढ मात्र नक्की ! 


Post a Comment

Previous Post Next Post