∆ लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा निवडणुक सुरू झाली.पण प्रचारात रंग भरत असुन कालपर्यंत महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा होत नव्हती म्हणून शिवसैनिक प्रचारापासून अलिप्त होते.पण शिवसेना जिल्हा प्रमुख व महाविकास आघाडीच्या नेत्यांत चर्चा होऊन अखेर शिव सैनिक मैदानात शड्डु ठोकले असुन प्रचारात शिवसैनिक अग्रेसर झाल्याचे दिसून येते.महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सरसावले.
नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व भोकर विधानसभा मतदारसंघाचा प्रचार सुरू झाला.सगळेच पक्ष,अपक्ष कामाला लागले आहेत.पंरतु महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणूक प्रचारात अलिप्त दिसून आला. काँग्रेस पक्षाकडून बोलावणे आले नसल्याचे सांगण्यात आले.पण दि.७ नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबन बारसे व काँग्रेस नेते व तालुका प्रमुख संतोष आलेवाड, वर्षेवार यांची बैठक संपन्न झाली.यात शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात आली.अन शिवसैनिक प्रचाराच्या मैदानात शड्डु ठोकत महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवार प्रा.रविद्र चव्हाण व भोकर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पप्पू पाटील कोंढेकर यांना निवडून आणण्याचा निर्धार करत भोकर तालुक्यातील मौजे हस्सापुर, लामकानी, रिठ्ठा, पांडुरंगा, समंदरवाडी, डोरली, बोरवाडी, चिदगिरी,रामु नाईक तांडा, ताटकळवाडी, वागद, आमदारी वाडी,आमदरी तांडा,नारवट आदी गावात झंझावात दौरे केले आहे.यात जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनी कर, तालुका प्रमुख संतोष आलेवाड, शहरप्रमुख पांडुरंग वर्षेवार,माजी तालुकाप्रमुख माधव पा. वडगावकर, मनोहर साखरे, गंगाधर महादवाड, साहेबराव भोंबे, रमेश महागाव कर, पप्पू पा.जाकापुरकर,मानेजी भालेराव आदी शिवसैनीक प्रचारात सहभाग घेतला.