प्रतिनिधी / माली पाटील
∆ भोकर विधानसभा मतदारसंघात १४४ उमेदवारानी उमेदवारी अर्ज मागे दाखल केली होती.त्यात ११५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात २५ उमेदवार राहीले असुन विषेश म्हणजे ओबीसी बहुजन पक्षाचे उमेदवार जे आता शेवटची निवडणूक म्हणून लढण्याची इच्छा व्यक्त करणारे बहुजन नेते नागनाथ घिसेवाड यांच्या उमेदवारीमुळे सर्व सामान्य मतदारांनी आनंद व्यक्त करत शाळेवर भेटण्यासाठी मोठी गर्दी केल्याने महाविकास आघाडी व महायुती या दोन् आघाड्याना घिसेवाड धक्का देऊन विधानसभेत निश्चित प्रवेश करतात की काय ? असी चर्चा रंगत आहे.
उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा आज दि.४ ऑक्टोबर शेवटचा दिवस. भोकर विधानसभेत १४४ उमेदवार निवडणुक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखल केलेले अर्ज हे एक कोडेच होते.पंरतु महायुतीच्या पक्षाकडून अनेक उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. यात मात्र लक्ष्मी प्रसन्न झाल्याचे दिसले.अनेकांना लक्ष्मीच्या माध्यमातून उमेदवारी माघार घेण्यासाठी एक प्रकारे झुंबडच होती.असे करता करता अखेर २५ उमेदवारानी उमेदवारी कायम ठेवलीच. तर लोकसभा पोटनिवडणुकी साठी १९ उमेदवार रिंगणात. भोकर विधानसभेसाठी खरी रंगत आता महायुतीच्या अँड. कु.श्रीजया चव्हाण, महा विकास आघाडीचे तिरुपती उर्फ पप्पु कोंडेकर, ओबीसी बहुजन आघाडीचे नागनाथ घिसेवाड, वंचितचे सुरेश राठोड,रासपा साहेबराव गोरठकर मनसेचे साईकुमार जटलवार असी बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.असे असले तरी सर्व सामान्य मतदारांमध्ये नागनाथ घिसेवाड यांच्या उमेदवारीचे लय वाटत असुन यावेळी नागनाथ घिसेवाड यांना निवडुण देत महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणार असल्याचा उत्साह त्यांना भेटण्यासाठी आलेल्या गर्दीवरुन दिसुन आला.शेवटची निवडणूक असुन यावेळी संधी द्या.असी भावनिक आवाहन नागनाथ घिसेवाड करताना दिसुन येत आहे.याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.यात मुस्लिम,दलीत, ओबीसी हे घटक घिसेवाड यांच्या बाजुने वळताना दिसत आहे. तसेच वरकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे पारडे जरी दिसत असले तरी अनेक कलहाने त्यांचा घात होऊ शकतो काँग्रेसचे पप्पु पाटील कोंढेकर यांच्या बाबत निगेटिव्ह मत तयार होताना दिसत आहे.महाविकास आघाडीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अद्याप सहभाग दिसला नाही.वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड यांना बंजारा समाजाचा म्हणावा तेवढा प्रतिसाद दिसत नाही. कारण असंख्य बंजारा बांधव घिसेवाड सोबत दिसत आहेत.सोबतच मनसे,रासपा हे पक्ष ही चाचपडताना दिसत आहेत.असो येणाऱ्या २३ तारखेलाच कळेल की भोकर विधानसभा मतदारसंघाचा सात बारा कोणाचा आहे. ते कळेल !