भोकर विधानसभा मतदारसंघातील रासपा पक्षाचा प्रचाराचा नारळ ऋंगरुषी येथे फोडला

              प्रतिनिधी/ बी.प्रकाश

भोकर - भोकर विधानसभा मतदारसंघ-८५ मधील राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार साहेबराव गोरठकर यांच्या प्रचाराचे नारळ मौजे सावरगाव माळ येथील ऋंगरुषी मंदिरात फोडण्यात आले.यावेळी रासपा उत्तर जिल्हाध्यक्ष भिमराव शेळके यांनी ओबीसी चेहरा असलेले रासप उमेदवार साहेबराव गोरठकर यांना भरघोस मते देऊन निवडून द्यावे असे आवाहन केले.

   भोकर विधानसभेचे रासपा उमेदवार साहेबराव गोरठकर यांच्या प्रचाराचे नारळ दि.७ नोव्हेंबर रोजी ऋंगरुषी येथील मंदिरात जिल्हाध्यक्ष भिमराव शेळके यांच्या हस्ते फोडण्यात आले.यावेळी उमेदवार साहेबराव गोरठकर यांनीही पुजन करुन नारळ फोडले.यावेळी येथे उपस्थित कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष भिमराव शेळके म्हणाले की, महायुतीने महादेव जानकर साहेब यांना फसवण्याचे काम केले आहे.त्यामुळे जानकर साहेब यांनी अनेक उमेदवार उभे केले आहेत.आपल्या भोकर विधानसभेत तरुण व मतदार संघाचा अभ्यास असलेले साहेबराव गोरठकर यांना उभे केले आहे.सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन जाणारा आपला पक्ष असल्याने कार्यकर्त्यां नी जोमाने कामाला लागुन गोरठकर यांना भरघोस मतांनी निवडून आणावे असे प्रतिपादन केले.यावेळी उमेदवार साहेबराव गोरठकर यांनी भोकर विधानसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुजन बहुबल असल्याने सर्व मतदारांनी शिटी या चिन्हावर बटन दाबुन निवडीत द्यावे असे आवाहन केले. यावेळी रासपा जिल्हा सरचिटणीस माधव सलगरे, तालुका प्रमुख अध्यक्ष मारोती वरणे, तालुका सरचिटणीस डॉ. दिगाबंर पपुलवाड, तुळसिराम पप्पुलवाड, जेष्ठ नेते रामजी मुंडकर, साईनाथ भंडरवाड, शंकर पांचाळ, प्रदीप नरवाडे, बालाजी पोलवाड आदी कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. 


Post a Comment

Previous Post Next Post