• राज्याचे कृषीमंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्याऐवजी मोबाईल वर रर्म्मीचा डाव खेळत बसले यांचा जाब विचारणार्या छावाच्या शेतकरी पुत्राला राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाण व त्यांच्या गुंडाकडून जबर मारहाण केल्याने याच निषेधार्थ भोकर येथे विविध पक्ष व संघटनेकडून डॉ.आंबेडकर चौकात रम्मीचा डाव मांडत राष्ट्रवादी नेत्यांच्या फोटोला जोडे मारुन आंदोलन करत छावाचे घाडगे यांच्या वरील हल्ल्याचा तिव्र निषेध केला आहे.
महाराष्ट्र राज्यात शेतकरी व जनविरोधी सरकार बसले असुन या सरकारच्या काळात मंत्री भ्रष्टाचाराने बरबटले असुन काही मंत्री तर बेजबाबदार पणे वागत असल्याने हे महाराष्ट्र आहे की बिहार असा सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
कृषीमंत्री माणीकराव कोकाटे यांनी विधीमंडळात कामकाज सोडून रम्मी या पत्याचा डाव मोबाईल वर खेळत बसले. तेव्हा शेतकऱ्यांत तिव्र संताप व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी अजीत पवार गटाचा मेळावा लातुरात होत असताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत असताना छावा संघटनेचे प्रदेश युवा अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील व त्यांचे सहकारी यांनी सुनील तटकरे समोर पत्ते फेकले अन् मंत्र्यांचा राजीनामा घ्या म्हणुन निवेदन दिले.त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरूच चव्हाण व त्यांचे गुड साथीदार यांनी घाडगे यांना विनाकारण बेदम मारहाण करण्यात आले. त्याचा निषेध म्हणून छावा संघटना भोकरच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात छावा,उबाठा,प्रहार, स्वा.शेकरी संघटना व भिमा टायगर यांच्या वतीने पत्त्यांचा डाव मांडुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले.यानंतर बॅनर वरील राष्ट्रवादी नेत्यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.या आंदोलना त छावा जिल्हा अध्यक्ष जेष्ठ नेते शिवाजी पा. किन्हाळकर, छावाचे संपर्कप्रमुख शंकर पा.बोरगावकर,उबाठा पक्षाचे जिल्हा उ संघटक सुभाष नाईक किनीकर, प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष अँड.शेखर कुंटे, राजु ईबितवाड, परमेश्वर सावळे, भिमा टायगर सेनेचे मिलिंद गायकवाड,अनील पा.भोसले,दत्ता हरी पा. कोळगावकर, गुलाब पा.नांदेकर,कपिल पा. किन्हाळकर, गंगाधर धारजनी कर,उमरी छावा प्रमुख राजेश जाधव, संतोष मनमदे,स्वा. शेतकरी संघटनेचे मंगेश खरबीकर,दत्त हरी कागुलकर,डि.व्ही स्वामी, उबाठा उप तालुका प्रमुख मारोती पवार, नारायणरेड्डी करेमगार सह शिवसेना उबाठा, प्रहार,भिमा टायगर सेना, स्वा. शेतकरी संघटना आदी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.या वेळी पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शैलेश औटे,जाधव व कर्हाड यांनी कडक बंदोबस्त ठेवला.यानंतर पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांना निवेदन देण्यात आले.
लोकभावना न्यूज मधील बातम्या वाचकाच्या पसंदीदा असतात
ReplyDelete